नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर आपल्या प्रसन्न हवामानासाठी व गतिशील विकासासाठी ओळखले जाते.
नाशिकला भारताची 'वाईन कॅपिटल' हा मान मिळाला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे.
येथे दर १२ वर्षांनी जगप्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
नाशिक हे महाराष्ट्रातील एक वेगाने विकसित होणारे उत्पादन व औद्योगिक केंद्र आहे.
पांडवलेणी, अंजनेरी व त्र्यंबकेश्वर ही निसर्गरम्य पर्यटन आणि ट्रेकिंगची आवडती ठिकाणे आहेत.